सोम वंशी !
चंद्रमा तुझ्या साक्षीने
सिद्धार्थ बुद्ध झाले
तुझे पौर्णिमेचे चांदणे
त्या समयी फळाला आले
उगवतोस रोज तू
मावळतोस सकाळी
कलाकलाने वाढतोस
जातोस तसाच खाली
तुझे कृष्ण शुक्ल पक्ष
समतोल साधणारी
अमावश्या जणू तृष्णा
पौर्णिमा ज्ञानाची भरारी
बोधी वृक्षाच्या पानापानातून
बरसले ते तुझे अमृत चांदणे
रवि किरण फाकिले ज्ञानाचे
ते अवलौकिक दृश्य तूच देखील
तू पूर्ण चंद्र पौर्णिमेचा
साक्षी जन्म , ज्ञान प्राप्तीचा
तसाच धम्म प्रवर्तनाचा
अन निर्वाणाच्या अंतिम क्षणाचा
धन्य सर्व त्या पौर्णिमा
धन्य धन्य तू चंद्रमा
सोम वंशी आम्ही लेकरे
सतश्या प्रणाम हे सोमा !
#जनसेनानी #Jansenani कल्याण

Comments
Post a Comment